Welcome: to "Shaheen-De"

Welcome: to "Shaheen" Welcome to-“Shaheen " चारोळयांच्या दुनियेत तुमचे स्वागत करते आहे.- Kavyapushpa.Kavitri- “Shaheen-De " Thanks..! .

Sunday, 17 October 2021

काहूर.... 17-10-2021

कल्पनेच्या  गावात .....
काहूर का  माजले....
शब्द  हरवतील.....
उगाच  वाटले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शब्दफुलांनी तूझ्या..... 
काहूर रे दाटते..... 
ऋणानुबंध वेगळेच ....
तुझ्याशी वाटते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अंतरी भाव  ते....
पुन्हा पुन्हा उठलेले ....
आठवांचे  काहूर का....
आज मनी दाटलेले...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भरलेल्या  डोळ्यात  तूझ्या .....
काहूर का  दाटले.....
रडावे सोबतीने तुझ्या ....
का ग असे वाटले ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
परक झालं  म्हणे  माहेर...
काहूर मनी ग दाटलं....
जगरहाटी  ची का बाहुली मी....
मनाला वाईट ग वाटलं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                     शाही... ✍️✍️

 

Tuesday, 5 October 2021

🌹जगायचं राहून गेलं 🌹 ...

 

🌹जगायचं  राहून गेलं 🌹

जगायच  राहून गेलं 
नकळत  सरून गेल
बालपण म्हणता  म्हणता
कळले मोल त्याचे तेव्हा 
तारुण्य  स्पर्शून  गेल
खरच की
बालपण  जगायच राहून गेल
तारुण्याच्या उंबरठ्यावर 
आकाश कवेत  घ्यायचा बळ
पण बंधंनांच्या पिंजर्‍यात 
चालली पंखांची फडफड
यातच तारुण्य  सरून गेल
नकळत झालेल पहिल प्रेम 
अव्यक्तच राहून गेलं 
खरंच  की... 
तारुण्य  जगायचं  राहून गेलं 
संसाराच्या उंबरठ्यावर 
स्वप्न  सारी फूलवतांना
पोक्तपण बहाल झाल
यातच म्हातारपण येउन गेल
खरच की.... 
स्वप्नातला संसार थाटातच राहून गेलं ...
आयुष्याची उणे बेरीज करता...
मरण दारात येऊन  गेल....
अरेच्या  खरच की....
जगायचं राहूल गेलं...... 

                 🌼  शाही 🌼

काहूर.... 17-10-2021

कल्पनेच्या  गावात ..... काहूर का  माजले.... शब्द  हरवतील..... उगाच  वाटले.... 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 शब्दफुलांनी तूझ्या.....  काहूर रे द...

Search This Blog